दि न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे मध्ये ‘ शिक्षकदिन ‘ संपन्न
बांबवडे : दि न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं डॉक्टर सर्वपल्ली राधाक्रीष्णन यांच्या५ सप्टेंबर या जन्मदिनी ‘ शिक्षकदिन ‘ साजरा करण्यात आला. इयत्ता ७वी च्या वर्गाने शिक्षकदिनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिसाळ सर होते.
प्रथम सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वंदन केले. यावेळी ७ वी च्या विद्यार्थिनी ऋतुजा भाकरे, वैष्णवी पाटील, वैष्णवी यादव, अपर्णा भाकरे,व सानिका सावंत यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देवून शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ७ वी चे वर्गशिक्षक श्री आकारम तुकाराम दिंडे यांनी केले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिसाळ सरांनी डॉ.सर्वपल्ली राधाक्रीष्णन यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी श्रुतिका यादव, स्नेहल यादव, नेहा पाटील, स्वराली यादव, दिगंबर पाटील ,सुयश हांडे, व सोहम शेळके या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांच्या नात्याविषयी, तसेच शिक्षकदिनाविषयी आपली मनोगते व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा दाभोळकर या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन श्री कांबळे सर यांनी केले. या कार्यक्रमास श्री एस.डी. गवळी, सौ.एस.वाय.शेळके, श्री.एम.एम.खुटाळे व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.