‘ सोनवडे ‘ चे ‘ गायरान ‘ देण्यास ग्रामस्थांचा कडवा विरोध : शासनाला निवेदन

बांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील गायरान विद्युत वितरण कापणीस देनेस विरोध असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी मंडल अधिकारी बांबवडे यांना दिले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, सोनवडे तालुका शाहुवाडी येथील गायरान गात नं.१०१८ मधील ०.४० आर क्षेत्र विद्युत वितरण कंपनीस देणेबाबत मंडल अधिकारी यांनी तशा आशयाचे पत्र ग्राम्पान्चायातीस दिले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश देखील यासंदर्भाने आणले होते. परंतु सदरचे गायरान गावच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अत्यल्प आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच या गाय्रानास जाण्याकरिता वाट अरुंद असून त्यावरून ये-जा झाल्यास तलावाचा भाराव खचून तलाव फुटण्याची शक्यता आहे. तसेच गावच्या धनगर समाजास मेंढरे पळून उपजीविका करण्यास हे गायरान गरजेचे आहे. दरम्यान सगळीकडे झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गाजत असताना या गायरानात झाडांची लागवड शासन नियमाने केली आहे. असे असताना विद्युत कंपनीस हि जागा देणे, योग्य ठरणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी दिले असून देखील आज कब्जासाठी शासकीय अधिकारी आले होते. म्हणूनच सर्व ग्रामस्थांनी या जबरदस्तीला कडाडून विरोध केला आहे.
भविष्यात गावचे गायरान शाळा, आरोग्य केंद्र व इतर समाजोपयोगी कारणाकरिता याचा वापर करता येईल ,असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शासनाला दिलेल्या निवेदनावर गावच्या सरपंच सौ.आनंदी आनंदा पाटील,उपसरपंच प्रकाश पांडुरंग पाटील, विष्णू जोती पाटील, वसंत पाटील वस्ताद, गुरुनाथ शिंदे, अनिल पाटील, कोंडीबा काशीद, बळवंत पाटील, सौ.हेमलता सुतार, संगीता भगवान पाटील, मुक्ताबाई वाघमारे, संगीता वसंत पाटील, विश्वास पाटील, रामचंद्र काशीद, शंकर सुतार, राजाराम पाटील, बाबासो पावणे, जगन्नाथ पाटील, सुभाष पाटील, हरिभाऊ पाटील आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!