पोहाळे येथे नवनाथ हायस्कूल मध्ये संगणकाची चोरी

कोडोली प्रतिनिधी
पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा येथील नवनाथ हायस्कूलच्या संगणक कक्षाची कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी संगणक साहित्याचे सुमारे ७५ हजार रुपयाची चोरी केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या चोरीची नोंद मंगळवार दि. १२ रोजी रात्री नऊच्या सुमारास कोडोली पोलिसांत करण्यात आली आहे.
पोहाळे येथील नवनाथ हायस्कूल गावाबाहेर आहे. दि.९ ते ११ या तीन दिवसांच्या कालावधीत शाळेकडे कोणी नव्हते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून ही धाडसी चोरी केली आहे. याबाबतची फिर्याद हायस्कूलचे लिपिक कृष्णात रघुनाथ पोवार यांनी कोडोली पोलिसांत दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत चार मॉनिटर, दोन सर्वर, एक प्रोजेक्टर, दोन वेब कॅमेरे, माऊस यासह आवश्यक संगणक साहित्य यांचे सुमारे ७४९६० हजार रुपयांची ही चोरी झाल्याचे नोंदवले आहे .
कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, फौजदार शामराव देवणे, सहायक फौजदार घोडके व पोलिस कर्मचारी या चोरीचा तपास करीत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!