सामाजिक

डी .वाय. पाटील कॉलेज च्या बेस्ट स्टुडंट चे आकस्मिक निधन

कोडोली प्रतिनिधी
बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील प्रसिध्द खेळाडू नाथाजी वसंतराव चव्हाण (वय २४ ) याचे आकस्मिक निधन झाले .तो सध्या तळसंदे येथील डॉ डी वाय पाटील अॅग्री कॉलेजमध्ये बी. एस. सी. अॅग्री च्या तृतीय वर्षात शिकत होता . कॉलेजने नुकताच त्याला बेस्ट स्टुडंट अॅवार्ड देऊन सन्मानीत केले होते .
कोल्हापूर येथील वसंतराव चौगुले सहकारी पत संस्थेचे फायनान्स मॅनेजर वसंतराव शामराव चव्हाण यांचा तो एकुलता एक मुलगा होता.
रक्षाविसर्जन कार्यक्रम मंगळवार ( दि १९ ) रोजी सकाळी १० वाजता बहिरेवाडी येथे आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!