कोडोली मधील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
कोडोली प्रतिनिधी :
कॊडोली ता.पन्हाळा येथील न्हाव्याचा मळा नावाच्या शेतात मंगळवार दिनांक १९ रोजी सकाळी संदीप ( रामा) अशोक घाटगे वय २७ या तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी; संदीप घाटगे राहणार न्हाव्याचा मळा कोडोली हा ट्रकवर किन्नर म्हणून काम करत होता. संदीप हा शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कामावर जातो म्हणून, घरातून बाहेर पडला होता. मंगळवार दिनांक १९ रोजी सकाळी ८ वाजण्याचा सुमारास शेत मालक आनंदराव पाटील यांना संदीप घाटगे हा त्यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला. याबाबतची तक्रार पाटील यांनी लगेच कोडोली पोलीस ठाण्यात दिली. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. कोडोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत…