‘ स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी ‘ अभियानात ‘ खराटा ‘ व ‘टमरेल ‘ प्रथम
शिराळा : सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘ स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी ‘ अंतर्गत आयोजित केलेल्या लघुचित्रपट स्पर्धेतील खराटा व टमरेल या मोठ्या व लहान गटात शिराळा तालुक्याने आपली मोहर उमटवली आहे. खराटा व टमरेल या लघुपटांना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यात आले.
हा बक्षीस वितरण समारंभ वसंतदादा पाटील सभागृहात पार पडला. यावेळी शिराळा येथील शिवरत्न फिल्म्स निर्मित ‘ खराटा ‘ लघुपटास मोठ्या गटात प्रथम व आरळा येथील एंजिल्स फिल्म निर्मित ‘ टमरेल ‘ या लघुपटास लहान गटात प्रथम क्रमांक मिळाला . सांगली येथील बाळासाहेब जाधवार यांच्या ‘ आता बसं …’ यास दुसरा तर आष्टा येथील स्मिती मुलाणी यांच्या लघुपटास तिसरा क्रमांक मिळाला.
निबंध स्पर्धेत लहान गटात आशुतोष वडगावकर, पूनम माने, साक्षी विटेकर, मोठ्या गटात वैष्णवी यादव, संभाजी पाटील, अश्विनी पाटील यांनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. या सर्व विजेत्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी अविनाश पाटील, एस.एन.कोळी, सुनील सावंत, पी.टी.सुतार, सतीश जाधव , निर्मात्या सौ.शोभा चौगुले, सुशीलकुमार पाटील, बालकलाकार शिवरत्न चौगुले, शिवाजीराव चौगुले, दत्तात्रय पाटील गिरजवडेकर, सुखदेव गुरव, प्रीतम निकम, एन.जी.पाटील , अविनाश खोत, किशोर ढाकरे, शीला राठोड, रणजीत पाटील, सागर रसाळ उपस्थित होते.