पोहाळे येथील नवनाथ स्कूलमध्ये संगणकाची चोरी प्रकरणी एकास अटक
कोडोली प्रतिनिधी :पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा येथील नवनाथ हायस्कूलच्या संगणक कक्षाची कडी कोयंडा उचकटून संगणक साहित्याचे सुमारे ७५ हजार रुपयाची चोरी करणारा प्रदीप तुकाराम कळके रा.कुशिरे यास कोडोली पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्या कडून ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोहाळे येथील नवनाथ हायस्कूल गावाबाहेर आहे दि.९ ते ११ या तीन दिवसांच्या कालावधीत शाळेकडे कोणी नव्हते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून ही धाडसी चोरी केली होती. याबाबतची फिर्याद हायस्कूलचे लिपिक कृष्णात रघुनाथ पोवार यांनी कोडोली पोलिसांत दिली होती. दिलेल्या फिर्यादीत चार मॉनिटर, दोन सर्वर, एक प्रोजेक्टर, दोन वेब कॅमेरे,माऊस यासह आवश्यक संगणक साहित्य यांचे सुमारे ७४९६० हजार रुपयांची ही चोरी झाल्याचे नोंदवले होते.
कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव,फौजदार शामराव देवणे,सहायक फौजदार घोडके व पोलिस कर्मचारी यांनी काही दिवसातच या चोरीचा छडा लावून आरोपी प्रदीप तुकाराम कळके याला अटक करून त्याच्या कडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.