भैरवनाथ मंदिराच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

पैजारवाडी प्रतिनिधी :
जेऊर (ता.पन्हाळा) येथील सद्गुरू चिले महाराज यांचे प्रमुख शक्तीपीठ असणाऱ्या भैरवनाथ बाबांचा शतकीमहोत्सवी दसरा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
स्वयंभू अष्टभैरवापैकी जेऊर येथे असणाऱ्या भैरवनाथ मंदिरातील अश्वारूढ पितळी मूर्तीस १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घटस्थापने दिवशी श्री भैरवनाथबाबा, मसाईदेवी यांच्या स्वयंभू पाषाणासह अश्वारूढ मूर्तीस प्रदीप चांदणे, संदीप खांडेकर, सुभाष दाभोळकर, जीवन डावरे,यांच्या हस्ते सहपत्नीक महारुद्राभिषेक व होमहवन करण्यात आले. त्यानंतर सरपंच प्रियांका महाडिक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये शंकर महाराज भंजनी मंडळ, तुळशीदास महाराज शिंपेकर यांचे कीर्तन, हनुमान सोंगी भजन शिये, टीव्ही स्टार सा रे ग म प फेम गायिका मोनिका साठे (पिशवी)यांचे गायन, संगीत विशारद श्रीधर सुतार यांचे शास्त्रीय संगीत व गुलशान मुल्ला यांचा लंलकार संगीत रंजनी कार्यक्रमा बरोबरच शाहिरी कार्यक्रमाचे ही आयोजन केले आहे.
१९१७ साली ग्रामस्थांच्या सहकार्यातून अश्वारूढ भैरवनाथ बाबांची पितळेची साडे पाच फूट उंचीची मूर्ती तयार करण्यात आली होती. या वर्षी या मूर्तीला १०० वर्ष पूर्ण होत आहे. दसऱ्यात घटस्थापना ते विजयदशमी या नवरात्र कालावधीत मोठा उत्सव प्रतिवर्षी होत असतो. गुलालाची उधळण होऊन गावातुन वाजत गाजत मूर्तीची मिरवणूक काढली जाते.
या वर्षी शतकमहोत्सवी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याने, भक्तांनी या कार्यक्रमाचा व श्रींच्या दर्शनाचा लाभं घ्यावा, तसेच याच वर्षी अष्टकोनी भैरवनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, मंदिराचे कलशारोहन व सद्गुरू चिले महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. असा या दोन घटनांचा दुग्ध शर्करा योग लवकरच जुळून येणार असल्याचे, देवस्थान समितीचे सचिव तानाजी पाटील यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!