सरपंचपदासाठी २५ तर ग्रामपंचायतीसाठी १०५ अर्ज दाखल
शाहुवाडी प्रतिनीधी(संतोष कुंभार ):शाहुवाडी तालुक्यातील ४९ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतून सोमवारी (ता. २५) प्रशासनाकडे तब्बल १३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी २५ तर उर्वरित १०५ अर्ज हे सदस्य पदासाठी दाखल झाले आहेत. यापुर्वी सरपंचपदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे आजपर्यंत अनुक्रमे २८ व १०८ अशी एकूण १३६ नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.