तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोडोली प्रतिनिधी:
साखर उद्योगासाठी दीर्घ कालिन धोरण अस्तित्वात असणे गरजेचे आहे आणि असे धोरण साकारण्यासाठी केंद्र सरकारशी संवाद साधने गरजेचे आहे असे मत माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांनी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत बोलताना व्यक्त केले. आज वारणा विद्या मंदिराच्या पटांगणात तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळ-मेळी वातावरणात पार पडली.
सहकारामध्ये अग्रणी असणाऱ्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वारणानगर येथील वारणा विद्या मंदिराच्या पटांगणात मोठ्या खेळी-मेळी वातावरणात पार पडली. यावेळी दादासो जाधव यांनी अहवाल वाचन केले,सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहूमताने मंजूर केले. गतवर्षीच्या गळीत हंगामात ज्यांनी चांगले ऊस उत्पादन घेतले, अशा शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने गौरविण्यात आले. या सभेमध्ये माझी मंत्री विनय कोरे यांना डिलिट पदवी मिळाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचा सहवीज प्रकल्प बीओटी तत्वावर खाजगी कंपनी “आय एल एफ एस ” ला दिला होता,तो प्रकल्प कारखान्याने यावर्षी परत कारखान्याच्या मालकीचा करून घेतला. याबद्दल हि श्री विनय कोरे यांना सभासद आणि कारखाना प्रशासासनाच्या वतीने गौरवण्यात आले. या प्रकल्पाची मालकी कारखान्याची झाल्याने सभासदांना येत्या काळात चांगला ऊस दर देणे शक्य असल्याचे श्री कोरे यावेळी म्हणाले. सभासदांशी संवाद साधताना श्री कोरे यांनी साखर व्यवसाय,त्या पुढील समस्या आणि आवाहन आणि शासनाची बदलती धोरणे याविषयी चर्चा केली. आणि सभासदांना आश्वासित केले कि, संचालक मंडळ यापुढेही ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद यांच्यासाठी सकारात्मक प्रयत्न करेल.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. एस.कोले, तज्ञ संचालक व्ही.एस. चव्हाण, सर्व संचालक ,वारणा समूहातील अधिकारी पदाधिकारी , सभासद आणि ऊस उत्पादक उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!