पन्हाळा तालुक्यामधील अंगणवाडीतील पोषण आहार विनाखंडीत सुरू

कोडोली प्रतिनिधी :-
पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडीतील सुरु असलेला पोषण आहार विनाखंडित सुरु करण्यात आला असून, ग्रामपंचायत व बचत गट यांच्या माध्यमातून आहार पुरवठा केला जात आहे, अशी माहिती पन्हाळ्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यांनी दिली.
राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या संदर्भात संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तीन ते सहा वयोगटातील बालके अंगणवाडीत पोषण आहाराचा लाभ घेतात संपामुळे या बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये, यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, ग्रामविकास व पंचायती राज विभागाच्या सचिव असीम गुप्ता यांनी याअनुषंगाने विशेष आदेश पारीत करुन, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य सेवा विभागातील कर्मचारी, यांच्याशी समन्वय साधून आहार पुरवठा करण्यासाठी महिला बचत गट, तसेच पर्यायी स्वयंसेवी संस्थांना संपर्क साधून आहारपुरवठा करण्याचे सर्वच जिल्हा व तालुका प्रकल्प अधिकारी यांना आदेश देणेत आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्याचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते, पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण आहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .
कोडोली ग्रामपंचायत मध्ये प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यांनी ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील व पर्यवेक्षिका शोभा गुरव, रुपाली कांबळे यांची बैठक घेऊन पोषण आहार वितरित करण्यासंदर्भात बचत गटांना सूचना केल्या. पोषणहार वितरित करण्याच्या संदर्भाने केंद्रे निश्चित केली. .तालुक्यातील अनेक बचत गटांनी आहार देण्याची तयारी दर्शवून आहार देणेस सुरु केले आहे. कोडोली, मोहरे, नावली, उत्रे, ‘मल्हारपेठ, कोतोली, मरळी, माले, वेतवडे, धनगरवाडा, मुसलमानवाडी, बळपवाडी या गावात विनाखंडीत पहिल्या टप्यात आहार सुरु झाला आहे, असे प्रकल्प अधिकारी शिर्के यांनी याप्रसंगी सांगितले.
पन्हाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्पीकरद्वारे, दवंडीद्वारे पालकांना सुचना देऊन, तात्पुरते स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या शाळांतील केंद्रावरून पोषणहार आपआपल्या लाभार्थ्यांचा घेऊन जावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वच ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, महिला ग्रामपंचायत सदस्या, सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट, एकात्मिक बालविकास विभागाकडील सर्व पर्यवेक्षिका, कर्मचारी यांच्या समन्वयातून तालुक्यातील पोषण आहार सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे, प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यांनी सांगून पोषण आहार सेवा पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी सांगितले..
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कर्मचारी व इतर सेवकांनी अंगणवाडी संपास पाठिंबा दिल्याने, आरोग्यसेवा विभागाचे कर्मचारी या पोषण आहार कामी मदत करत नसल्याने, बचत गट व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा पोषण आहार पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे, प्रकल्प अधिकारी शिर्के यानी सांगून, तालुक्यातील सर्वच गावात पोषणआहार लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!