पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक अंतिम दिवशी;सरपंच पदासाठी २८४ तर सदस्य पदासाठी १५४८ अर्जं दाखल.
कोडोली वार्ताहर:-
पन्हाळा तालुक्यातील पहिल्या टप्यात ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकासाठी उमेदवार आणि सरपंच पदासाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती. आज अखेर पन्हाळा तालुक्यातून ,२८४ इतके सरपंच पदासाठी तर १५४८ इतके अर्ज सदस्य पदासाठी दाखल झाले आहेत.
सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकाच्या या फेरीत पन्हाळा तालुक्यात एकूण ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. दिनांक 22 सप्टेंबर ते आज दिनांक २९ सप्टेंबर अखेर हे या ग्रामपंचायतीच्या निडणुकीसाठी सरपंच आणि सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. पन्हाळा तहसील कार्यालयाच्या वतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून प्रत्येक गावासाठी एक अधिकारी आणि एक सहायक नेमण्यात आले होते. आज अखेर या निवडणूका साठी सरपंच पदा करीता २८४ एवढे अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदाकरीत,१५४८ एवढे अर्ज दाखल झाले आहेत…