शांती टाइम्सचे बाबा जाधव यांना मातृशोक
वारणानगर : कोडोली ता. पन्हाळा येथील शांती मेडिकलचे व्यवस्थापक प्रकाश जाधव यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई तातोबा जाधव वय ८२ यांचे शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी वार्धक्याने निधन झाले. शांती टाइम्सचे बाबा जाधव यांच्या त्या आई होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन दि. १ऑक्टोंबर रोजी सकाळी कोडोली येथे आहे.