आवळी येथे वीज पडून दोन म्हशीं ठार
कोडोली प्रतिनिधी:-
परतीच्या पावसाने विजेच्या कडकडाटात आवळीसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसात आवळी ता.पन्हाळा येथील जगन्नाथ श्रीपती पाटील यांच्या मिठारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात वीज पडून दोन म्हशीं जागीच ठार झाल्या.
जगन्नाथ पाटील हे आज सकाळी आपल्या जनावरांना घेऊन मिठारी नावाच्या शेतात गावात चारण्यासाठी गेले होते. आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या परतीच्या पावसाने आवळी परिसरात विजेच्या कडकडासह मुसलदार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, गवत चरत असलेल्या दोन म्हशी वर अचानक वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्याच बरोबर जगन्नाथ पाटील हे देखील जखमी झाले. मयत जनावरांची सुमारास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, पण अद्याप शासन दरबारी सदर बाबीची माहिती असून देखील कोणीही लक्ष दिलेले नाही आहे.