नारायण राणेंचा नवा पक्ष – महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

मुंबई : कॉंग्रेस ला राम राम ठोकून नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची स्थापना केली असल्याची पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग मधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केलेनंतर नारायण राणे यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकला. दरम्यान यांनी नारायण राणे यांची भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगात आली होती. परंतु राणे यांनी या नव्या पक्षाची स्थापना केल्याने राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.
दरम्यान नारायण राणे यांना एन डी ए मध्ये येण्याच आमंत्रण भाजपकडून दिल गेल आहे ,अशी माहिती विश्वसनीय सुत्राकंडून कळतंय. या नव्या पक्षाचे चिन्ह लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असही या पत्रकार परिषदेत सांगितले.

Mukund Pawar

Editor

2 thoughts on “नारायण राणेंचा नवा पक्ष – महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!