कुंभार परिवाराचा अभिनव उपक्रम : श्राद्धप्रसंगी संगणक भेट

शाहुवाडी प्रतिनीधी :
अंत्री खुर्द येथील मारूती गणपती कुंभार यांनी आपल्या पत्नी कै. सौ शालन मारूती कांबळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संगणाक प्रदान केला .
मुलांच्यां शैक्षणीक गुणवत्ते सोबतच आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचण्यासाठी आपल्या पत्नीच्या श्राध्दा दिवशी अन्य खर्चास फाटा देवून अंत्री खुर्द येथील प्राथमिक शाळेस संगणक भेट दिला .
जन्माला येणारा प्रत्येक माणुस हा आपल्यातुन निघुन जात असतो. पण त्यांच्या आठवणी आपल्या स्मरणात सतत तेवत असतात. मग अशा वेळी त्यांच्या आठवणीच्या माध्यमातून, सामजिक बांधिलकीच्या माध्यमातुन अंत्री खुर्द येथील कुंभार परिवाराने एक आदर्श वत उपक्रम राबविला आहे .
पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम कुंभार, पांडुरंग कुंभार , मारूती कुंभार , निवृत्त पोलीस हवालदार शिवाजी कुंभार , मुबंई पोलीस विजय कुंभार , संजय कुंभार , मानसिंग कुंभार , गोरख कुंभार आदि कुंभार परिवाराचे उपस्थितीत मुख्याध्यापक विश्वास कुंभार यांच्या कडे संगणक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अध्यापक प्रकाश पाटील , अध्यापिका सुनंदा पाटील , प्रमिला देसाई आदि सह विद्यार्थी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!