शंभू राजेंचा टेहळणी बुरुज घेतोय अखेरचा श्वास … : सार्वजनिक बांधकाम जागे होईल का ?
पन्हाळा वार्ताहर:-
ऐतिहासिक पन्हाळगडावरील असणाऱ्या दुसरे संभाजीमहाराज यांच्या मंदीराच्या पूर्वेकडील असलेला टेहळणी बुरुज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरचा श्वास घेत आहे. हा बुरुज कधी जमिन्दोस्त होईल, हे सांगणे कठीण बनले आहे. तरी हा बुरुज नामशेष झाल्यावरच ,सार्वजनित बांधकाम विभाग व पुरातत्व विभाग डोळे उघडणार काय..? असा संतप्त सवाल इतिहास प्रेमी,पन्हाळावासिय तसेच पर्यटकांच्यातुन होत आहे.
छत्रपती घराण्यातील दुसरे संभाजी महाराजांचे मंदीर पन्हाळा येथे १७७४ ते १७६९ या कालावधीत उभारले आहे. पन्हाळा हे राजधानीचे ठिकाण होते.दुसरे संभाजी महाराज यांचे देहवासन टोपसंभापुर ता.हातकणंगले येथे झाले, त्यानंतर त्याच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ हे मंदीर बांधण्यात आले. या मंदीराचे व्यवस्थापन कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज यांच्या कडे आहे. पण मात्र या मंदीर परिसराची डागडुजी, रंगरंगोटी सार्वजनिक बांधकाम विभाग पाहात आहे. पण अलिकडच्या चार ते पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मंदीर परिसराची दुरावस्था होऊन, मंदीराच्या बांथकामावर झाडे,झुडपे,वेली यांनी अतिक्रमण केले आहे. तर.पुर्वेकडील असणाऱ्या या मंदीराच्या टेहळणी बुरुजाची देखील या पेक्षा बिकट अवस्था आहे. गेल्या एक दोन वर्षापासुन या टेहळणी बुरुजाचे बांधकाम कमकुवत झाले आहे. तरी सध्या पन्हाळ्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या बुरुजाचे दगड निखळत चालले असुन, हा बुरुज कधी जमिन्दोस्त होईल, हे सांगणे कठीण बनले आहे. तसेच या बुरुजाच्या कमकुवत झालेल्या बांथकामामुळे आसपास राहणाऱ्या लोकांच्यात घबराट पसरली आहे. तरी एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच सार्वजनिक विभागाचे डोळे उघडणार काय..? असा सवाल निर्माण झाला आहे. तरी या इतिहासाचा ठेवा नामशेष होण्यापासुन बचाव होण्यासाठी, त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.