शिराळा तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींच्या छाननीत सरपंच पदासाठीच्या १व सदस्य पदासाठीचे ९असे एकूण १०अर्ज अवैध
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींसाठी आज छाननी झाली. त्यात सरपंच पदासाठीच्या १व सदस्य पदासाठीचे ९असे एकूण १०अर्ज छाननीत अवैध झाले.
६० सरपंच पदासाठी ३०६ तर ५०४ सदस्य पदासाठी १६४७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सरपंच पदासाठी ३०५ तर सदस्य पदासाठी १६३८ अर्ज वैध ठरले आहेत .
खेड ग्रामपंचायत कविता सुरेश कांबळे यांनी जातीचा दाखल जोडला नाही.
चरण ग्रामपंचायतसाठी सरपंच पदासाठीचा पंडित तातोबा बाबर यांनी जात पडताळणी प्रस्ताव सादर केलेला पुरावा सादर केला नाही. तर कृष्णा आनंदा बाबर यांनी ग्रामपंचायत थकबाकी भरलेली नाही.
शिवरवाडी येथील रुपाली अशोक सपकाळ यांनी सदस्य पदासाठी एका प्रभागात दोन वर्गवारीसाठी अर्ज केला. त्यामुळे एक अर्ज बाद झाला. औंढी येथील धनाजी हणमंत घेवदे यांना तीन अपत्य आहेत. पाडळेवाडी येथील शोभा विश्वास पाटील यांनी शिराळा ऐवजी तालुका वाळवा भरला. तर दिनकर गोविंद गिरीगोसावी यांनी जात पडताळणी प्रस्ताव सादर केलेला पुरावा सादर केला नाही. जातीचा दाखला मुलाचा दिला.
भटवाडी येथील सुवर्णा संपत चव्हाण यांनी अनामत रक्कम भरली नाही. मांगले येथील राजेंद्र नीलकंठ पाटील यांनी एकाच प्रभागात दोन वर्गवारीसाठी अर्ज केला. त्यामुळे एक अर्ज बाद झाला. सोनवडे येथील जयवंत चंद्रू गुरव यांनी जातीच्या दाखल्याची मूळ प्रत सादर केली नाही. या कारणामुळे तालुक्यातील १०जणांचे छाननीत अर्ज अवैध झाले.