वारणा महाविद्यालयात “मुक्त अर्थव्यवस्था”व्याख्यान उत्साहात..
कोडोली वार्ताहर:-
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय आणि केखले येथील मारुती चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ” मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांची होत असलेली फसवणूक “, या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालय ग्राहक संरक्षण परिषद सदस्य श्री संजय हुक्केरी उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ.सुरेखा शहापुरे होत्या.
प्रमुख पाहुणे श्री.हुक्केरी या वेळी म्हणाले की ,”जाहिरातींना बळी पडून कोणतीही वस्तू खरेदी करू नये. वस्तूची गुणवत्ता तपासून पहावी. फसवणूकी नंतरही लोक कुठेही दाद मागत नाहीत. याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, श्री. सुशांत पाटील ,बी.जे.पाटील या वेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ऑनलाइन शॉपिंग, विज बिल, सोने -चांदी खरेदी, दुकानदारांच्या कडून होत असलेली फसवणूक, नकली वस्तूंची विक्री या विषयांवरील प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस. एम. आरडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आर. बी. पाटील यांनी केले तर आभार प्रा.आर.बी. बसनाईक यांनी मानले.