५ ऑक्टोबर अर्ज माघारीचा अंतिम दिवस : लगबग सुरु
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असून, या निवडणूक कार्यक्रम अंतर्गत ५ ऑक्टोबर ,हा अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे.
उद्यापासून खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्याची लगबग आत्तापासूनच सुरु झाली असून, उमेदवार आपापल्या प्रभागात संपर्क साधून आहेत. तर वरिष्ठ नेते या निवडणुकांवर नजर ठेवून आहेत.