शिराळ्यात १० ग्रामपंचायती बिनविरोध तर ५० ग्रामपंचायतीसाठी घुमशान
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायती पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५० ग्रामपंचायतींसाठी घुमशान सुरु झाले आहे. आज सरपंच पदासाठी ३०५ अर्ज दाखल झाले होते त्या पैकी १५२ जणांनी माघार घेतल्याने ३८ जागांसाठी १३४उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी १६३८अर्ज होते त्या पैकी ६४८जणांनी माघार घेतल्याने ८८९ उमेदवार रिंगणात आहेत.
नाईक देशमुख यांनी चिखली व कोकरुड हि आपली गावे बिनविरोध केलीत . १०ग्रामपंचायत पैकी सत्यजित देशमुख ५, माजी आमदार मानसिंगराव नाईक ३ तर आमदार शिवाजीराव नाईक यांना २ ग्रामपंचायती ताब्यात घेता आल्या असून वाकाईवाडी येथे देशमुख गटाचा सरपंच आहे.
शिंदेवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने सरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्याने हे पद रिक्त राहिलेआहे.
शिराळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीसाठी सरपंच व कंसात सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार पुढील प्रमाणे : आरळा ४ (२७),सोनवडे २(१५),चरण ४(२३),मोहरे ३ (९),नाठवडे २(१३),काळुंद्रे २(१८), किनरेवाडी २(१०),मणदुर ४(२६),मांगरूळ २ (१८), येळापूर २(२३),हातेगाव २(१४), खिरवडे २(१३),खेड २(६),रेड २(१७),भटवाडी २(१४),बेलदारवाडी३ (१२),देववाडी २(१९),लादेवाडी २(१३),मांगले ३(३७),सागांव ६(५०), ढोलेवाडी३(१६),पावलेवाडी १(१४), तडवळे २(१८), शिराळे खुर्द ३(१४),पुनवत ३(१८),कणदुर २(२२),फुपेरे ३(२०),नाटोली ५(२६),वाडीभागाई ४(१४),कापरी ३(२४),उपवळे २(७),बिऊर ३(२२),धामवडे २(०),कोडांईवाडी २(१४),प.त.शिराळा २(१४),शिवरवाडी २(४),अंत्री खुर्द २(१५),अंत्री बुद्रुक ३(१७),पाचुंब्री २(२८),पाडळी ३(१८),पाडळेवाडी ४(१६),ओैंढी ३(१७),करमाळे ३(१९),टाकवे ३(१२),भैरववाडी ३(११),घागरेवाडी २(१२),गुढे ३(१५),कांदे२(२४),निगडी २(१८)
* वाकाईवाडी येथे सरपंच व प्रभाग २हे बिनविरोध झाले आहेत. इतर प्रभागासाठी निवडणूक लागली आहे.
* तसेच खालील – १० ग्रामपंचायत बिन विरोध झाल्या आहेत.
कोकरुड,माळेवाडी, चिखली, शिंदेवाडी, गिरजवडे, चिंचोली, शेडगेवाडी, गवळेवाडी, खुंदलापूर, वाकुर्डे खुर्द.
याचबरोबर फक्त सरपंचपदासाठी खालील ग्रामापंचायतीमध्ये लढत होणार आहे.
धामवडे व उपवळे येथे सदस्य बिनविरोध असून फक्त सरपंचपदासाठी निवडणूक लागली आहे.