राजकीय

धुरा गाव गाड्याची : गोगवे सरपंच पदाचे उमेदवार – श्री.टी.एस.पाटील(काका) ,

गोगवे गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावा , असा इतिहास निर्माण करण्याचा मानस आहे. आजवर गोगवे गावच्या विकासासाठी कुणी काय-काय केले , याच्या खोलात न जाता, आपण काय करणार आहोत, हे महत्वाचे आहे. मी या गावाचा भूमिपुत्र म्हणून माझ्या मातीला, माझ्या जन्मभूमीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, असे अभिवचन देतो , असे मत गोगवे-तळपवाडी-ठमकेवाडी च्या श्री महालक्ष्मी पारदर्शक ग्रामविकास पॅनेल चे सरपंच पदाचे उमेदवार श्री.तुकाराम सीताराम पाटील (टी.एस.काका) यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले कि, या गावच्या मातीने या देशाला एक अनमोल नजराणा भेट केला आहे.देशभक्तीचा खूप मोठा सन्मान या गोगवे गावच्या मातीला या भूमीपुत्राने शहीद सावन माने यांनी दिला आहे. या भूमीपुत्राने दिलेलं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. देशाच्या सीमेवर लढलेल्या जवानाचे स्मरण गावाला, तालुक्याला , पर्यायाने देशाला कायम स्वरूपी राहावे. यासाठी इथ शहीद सावन माने हुतात्मा पार्क निर्माण करण्याचा माझा मानस आहे.
इथल्या गावच्या अनेक ग्रामस्थांनी देशसेवा केली आहे. आज हि मंडळी निवृत्त होऊन आपआपल्या घराकडे आली आहेत.अशा या देशसेवा केलेल्या निवृत्त ग्रामस्थासहित गोगवे-तळपवाडी-ठमकेवाडी इथल्या प्रत्येक नागरिकाला मुलभूत गरजांपासून वंचित ठेवले जाणार नाही, असा माझा शब्द आहे. नेहमीच राजकारणातून विकास कामे केली जातात . परंतु आपण विकासकामांच्या बरोबरीने राजकारण करणार आहोत. इथे असलेले अनेक गट – तट बाजूला ठेवून ग्रामस्थांची गरज काय आहे, याबाबत विचार करून शासन दरबारी कोणत्या-ना -कोणत्या माध्यमातून निधी आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाईल. गावच्या लोकांच्या मुलभूत गरजा म्हणजे नक्की काय? रस्ते, पाणी, वीज , शिक्षण या गरजा पूर्ण करण्यासाठी , राज्याकडून तसेच केंद्राकडून विविध मार्गाकडून योजना आणल्या जाऊ शकतात. फक्त तिथे पोहचायचे कसे , हे महत्वाचे आहे. आणि ते काम आम्ही निश्चित यशस्वीपणे पूर्ण करू. गावातील भावी पिढी केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत व्हावी , यासाठी प्राथमिक शाळेतील दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी ई – लर्निंग ,, संगणक प्रशिक्षण अशा विविध साधनांचा आणि योजनांचा यशस्वीपणे वापर करून घेतला जाईल. आणि माझ्या या दोन वाड्यासहित असलेल्या गावाला सुसंस्कृत भावी पिढी निर्माण करून देण्याचा माझा मानस आहे.
गावातील शिक्षण संस्थेच्या विलासराव शामराव तळप – पाटील विद्यालयाच्या माध्यमातून एक शिक्षण संकुल गावात कार्यान्वित आहे.त्यामुळे इथल्या माध्यमिक शिक्षणाची गरज पूर्ण झाली आहे. ह्या शिक्षणसंस्थेच्या स्वच्छ , पारदर्शी कारभारासाठी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी आदर्श पुरस्कारासाठी तालुक्यातून नामांकन दिले आहे.याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे.ज्यामुळे इथल्या मातीतला नवतरुण खेळात रस घेईल आणि आपल नैपुण्य सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न करेल.
इथल्या ग्रामीण जनतेच्या अडी-अडचणीसाठी तसेच आर्थिक उन्नतीसाठी मी स्वतः श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्थेची स्थापना केली. गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या अडी-अडचणी सोडवीत आलो आहे. या संस्थेच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभारामुळेच महाराष्ट्र शासनाने या संस्थेला उत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्कार प्रदान केला आहे. त्याचबरोबर श्री महादेव दुध व्याव.सह.संस्था हि तालुक्यातील सर्वाधिक दुध संकलन करणारी दुध संस्था आहे. यासाठी गोकुळ दुध संघाच्या वतीने आदर्श दुध संस्थेचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हे सर्व सांगतोय म्हणजे माजे गुणगान गात नाही तर पारदर्शक व्यवहाराचा पुरावा देत आहे. म्हणूनच आता संपूर्ण गावाचा व्यवहार स्वच्छ , आदर्श आणि पारदर्शी करण्यासाठी माझी उमेदवारी आहे.
गावाला भेडसवणारी पाणी पुरवठ्याची समस्या हि देखील महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय पेयजल योजना, शिव कालीन पेय जल योजना , अशा अनेक योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची गरज भागवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. मी जरी या गावात राहत असलो तरी माझे भाऊ-बंद वाडीत रहात आहेत. त्यांना देखील पाण्याची व्यवस्था देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाईल. यासाठी एका सक्षम पाणी पुरवठा संस्थेची स्थापना करण्याचा मानस आहे. गावांतर्गत रस्त्याचा प्रश्न नेहमीच आपल्याला भेडसावत असतो. गावच्या रस्त्यावरून गावच्या कारभाराची कळा काय आहे, हे लक्षात येत. म्हणूनच गावात शिरतानाच गावाचे रस्ते हे किमान चालण्या योग्य असावे. त्यावरून जाणारी आमची एखादी गरोदर माता-भगिनी सुखरूपपणे दवाखान्यापर्यंत पोहोचावी , असे रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
आयुष्यामध्ये कर्म नेहमीच करीत असतो . परंतु ह्या कर्माची जिथे सांगता होते, तिथच मर्म असतं आणि हे मर्म म्हणजे जिथे आपण दोन्ही हात जोडून लीन होतो, ते म्हणजे आपलं देवस्थान . गोगवे गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान आपल्याला आयुष्यभर प्रकाश देत आहे, पण ते मात्र अंधारातच आहे ओ . अख्ख्या जगाला प्रकाश देणारी प्रतिमा अंधारातच राहाणं म्हणजे माणसाने नियतीशी केलेला कृतघ्नपणाच ठरेल. परंतु आपण मात्र कृतज्ञ बनण्यासाठी या मंदिरामध्ये प्रकाश ज्योत निर्माण करणार आहोत. ज्या माध्यमातून हे देवस्थान केवळ गावाला नाय्हे तर अवघ्या तालुक्याला झळकत असलेले दिसून येईल, असाच आमचा प्रयत्न राहील.
सरतेशेवटी जिथे सगळी नाती संपतात , जिथे सगळे प्रयत्न थांबतात आणि जिथ माणूस अनंतात विलीन होतो, अशा स्मशानभूमीच सुशोभीकरण करण्याचा मानस आहे.ह्या सगळ्या गोष्टी करताना , मी इथ कुणावर उपकार करीत नाही. परंतु आपल्या सगळ्यांच सहकार्य मात्र निश्चितच अपेक्षीत आहे. कारण समाज घडविताना कोणा एका व्यक्तीने घडवून चालत नाही. तो सामाजिक मानसिकतेतून घडत असतो. आम्ही फक्त निमित्तमात्र होणार आहे. मी या गोगवे-तळपवाडी-ठमकेवाडी च्या सर्व रहिवाश्यांना विनंती करतो कि, इथल्या सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी उभा आहे. माझ्या मनाचा कयास विकासाच्या कळसाकडे निघाला आहे. फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे. आपण दिलेलं सहकार्य , हे निश्चितच विकासासाठी आणि गावांच्या मातीच्या भल्यासाठी अनमोल योगदान ठरणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी माझ्या शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून मला मतदान करा व भरघोस मतांनी निवडून आणावे. ज्या माध्यमातून विकासाच्या पहिल्या पायरीला सुरुवात होईल.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!