साळशी मध्ये ‘ जय हनुमान,बिरदेव ‘ च्या सौ. वैशाली बोरगे बिनविरोध

बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली सुभाष बोरगे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. साळशी तालुका शाहुवाडी या गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. दरम्यान जय हनुमान,बिरदेव संयुक्त आघाडीच्या उमेदवार सौ. वैशाली बोरगे यांच्यासमोर उमेदवार नसल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. यांच्यासोबत आणखी दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
सौ. बोरगे या मानसिंगराव गायकवाड (दादा),रणवीरसिंग गायकवाड (सरकार ),युवा नेते कर्णसिंह गायकवाड,व शिवसेना या संयुक्त आघाडीच्या उमेदवार आहेत.साळशी येथील प्रभाग क्र.४ मधून इतर मागासवर्गीय प्रकारातून निवडणुकीस सामोरे जात आहेत. दरम्यान त्यांच्या प्रभागात विरोधात कोणी उमेदवार नसल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत.
सौ. बोरगे या विद्यमान सदस्या असून आपल्या कारकिर्दीत त्यांनी विकासकामांना सहकार्य केले असून, सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग मोलाचा होता. लेक वाचवा अभियान त्यांनी सर्वार्थाने पुढे होवून स्वीकारले आणि त्यांचा पाठपुरावा देखील केला आहे. दरम्यान सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत त्यांना त्यांचे पती श्री.सुभाषराव बोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
साळशी मध्ये त्यांना जय हनुमान,बिरदेव संयुक्त आघाडीचे माजी उपसभापती महादेवराव पाटील साळशीकर ,जिल्हा परिषद सदस्य श्री .विजयराव बोरगे, पैलवान राजाराम मगदूम, सखाराम पाटील (नाना), माजी सरपंच गुंगा पाटील, डॉ. दिनकर पाटील, संजय पाटील मिस्त्री , माजी उपसरपंच आनंदा पाटील, उद्योगपती तानाजीराव मगदूम व सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!