साळशीतील सर्व जागा जिंकून युती अभेद्य ठेवा- रणवीरसिंग गायकवाड यांचे आवाहन

बांबवडे  (प्रतिनिधी) : गावच्या सर्वागीण विकासासाठी झालेली गायकवाड गटाची युती ही येथील निवडणूकीतील जय हनुमान-. बिरदेव संयुक्त आघाडीचा सर्वचा सर्व जागा जिंकून युती अभेद्य ठेवा. असे आवाहन उदय कारखान्याचे संचालक व युवा नेते रणवीरसिंग गायकवाड यानी केले.
साळशी ( ता. शाहुवाडी ) येथील ग्रामपंचायत निवडणूकीतील मानसिंगराव गायकवाड(दादा) व कर्णसिंह गायकवाड(युवा नेते ) युतीच्या जय हनुमान- बिरदेव संयुक्त पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी माजी उपसभापती महादेव पाटील, जिल्हा परिषद संदस्य विजय बोरगे, पैलवान राजाराम मगदूम,आदी मान्यवर होते.
प्रारंभी या निवडणूकीत बिनविरोध निवड झालेल्या विद्यमान सदस्या सौं. वैशाली सुभाष बोरगे, सौ. संगिता विकास लोहार, सौ . सुवर्णा शिवाजी बढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, सुपात्रे व साळशी गावांचे मावशीचे नाते असून, या गावाने खा. उदयसिंगराव गायकवाड व गायकवाड घराण्यावर प्रेम केले आहे. गायकवाड घराण्यानेच गावाचा विकास केला आहे . .येथून पूढेही गायकवाडच विकास करू शकतात असे बोलून ते पूढे म्हणाले कि, एकमेकांच्या विरोधात लढलेले असताना सुद्धा ही युती झाली, ती गावाच्या विकासासाठी झाली आहे. येथील निवडणूक समझोत्याने मिटवण्याचा प्रयत्न होता, पण विरोधकांनी ती लावली. त्यांची जागा त्यांना दाखविण्यासाठी एक झलक बारा सलग उमेदवारांच्या विजयासाठी कारखाना कर्मचारी व युतीने कामाला लागावे.
यावेळी माजी उपसभापती महादेव पाटील म्हणाले कि, गेल्या पाच वर्षात गावाच्या विकासापेक्षा एकमेकांच्या कुरघुडया करण्यातच गेली. आम्ही पाणी योजना केली तेच पाणी आहे. मुबलक पाण्यासाठी नवीन सहा इंची पाईपलाईनची गावाला गरज आहे. पोवारवाडी_भोसलेवाडी यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तोही सोडवला जाईल. गावात शांतता रहावी, व गावाचा विकास साधता यावा, या दृष्टिने ही गायकवाड युती झाली आहे. तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. राहीलेल्या सरपंचासह नऊ जागा विजयी कराव्यात. कोणतीही दिशा नसलेल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवावी.
जिल्हा परिषद संदस्य व नियोजन मंडळाचे संदस्य पैलवान विजय बोरगे म्हणाले कि, मी निवडून आलो, आणि साळशी , सोनवडे रस्त्याची बातमी आली. या रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो, आणि त्या रस्त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी ,त्यानुसार मंजुरीच्या मार्गावर आहे. नदीवरील विहीरीत डायरेक्ट पाणी जाते, ते शुध्दीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. स्मशान शेड व पोवारवाडी- खोतवाडी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. यासह साळ्शी गावाचा विकास करायचा आहे. आहे.

यावेळी पॅनेलचे सखाराम पाटील, माजी सरपंच गुंगा पाटील, एस.एच. पाटील यांची भाषणे झाली. तर कार्यक्रमास पै. राजाराम मगदूम, उदयोगपती तानाजी मगदूम, माजी सरपंच दिनकर पाटील, उपसरपंच आण्णा बढे , माजी उपसरपंच आनंदा पाटील, गंगाधर बोरगे, सर्जेराव बोरगे, के.एस. पाटील, दिपक पाटील, राहूल रेडेकर, उदय पाटील, तुकाराम पोवार, बाबासो खोत, कृष्णा भोसले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!