बांबवडे तील गणेशनगर मधील रहिवाशांचा मतदानावरील बहिष्कार मागे
बांबवडे: बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेशनगर मधील रहिवाशांनी आपला मतदानावर चा बहिष्कार स्थानिक उमेदवारांच्या आश्वासनावर मागे घेण्यात आल्याचे येथील नागरिकांनी एका निवेदनानुसार सांगितले.
काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी रस्त्याची दुरावस्था असल्याचे कारणाने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु येथील स्थानिक उमेदवारांनी दुरावस्था दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा बहिष्कार मागे घेतला असून सर्व नागरिक मतदान करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर विशाल साठे, विलास कोकणे, प्रभाकर रेवणकर, रामचंद्र शित्तुरकर, ज्ञानदेव कारंडे , नियाज मणेर, बबन नलवडे , बाजीराव परीटआदींनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.