शिराळ्यात ८६.९८ % चुरशीने मतदान , मतदारचे भात मळून मतदानाची विनंती

शिराळा,ता.१६: शिराळा तालुक्यात ५०ग्रामपंचायतींसाठी पाचुंब्री येथील किरकोळ बाचाबाची वगळता इतरत्र शांततेत ८६.९८ टक्के मतदान झाले. स्त्री मतदार ३२३५५ तर पुरुष मतदार ३४,४१५असे एकूण६६,७७० जणांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. हत्तेगाव येथे सर्वधिक म्हणजे९४.२९तर वाकाईवाडी येथे सर्वात कमी म्हणजे ७६.९७टक्के मतदान झाले. आज दिवभर पावसाने उघडीप दिल्याने उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्वत्र अत्यंत चुरशीने मतदान झाले. चरण येथील तिघांचा मुंबई येथून येताना वाटेत अपघात झाल्याने चरण व परिसरातील लोकांच्यात निरुत्साह जाणवत होता.

*पण यावेळी अनोखी घटना बघण्यास मिळाली : कांदे(ता.शिराळा)येथे महिला उमेदवाराने आपल्या पतीसह शेतात भात माळणीच्या ठिकाणी जाऊन भात झाडून मतदारांना मतदान केंद्रावर येण्याची अशी विनंती केली.*

गाव व टक्केवारी अशी देववाडी(९३.७४), लादेवाडी( ९३),निगडी(८९.५१),करमाळे(७१.४८),औंढी(८७.१५),तडवळे(९१.७६),गुढे(७९.८२),पाडळी(८८.६), पाडळेवाडी(८४.५३), अंत्री बुद्रुक(८२.१३), पाचुंब्री (८९.५६), प.त.शिराळा (८३.८१), घागरेवाडी(८६.१७), शिवरवाडी(८६.५७), पावलेवाडी(८८.८१), कापरी(८९.७३),मांगले(८६.६६),बिऊर(९१.७३),उपवळे(८५.०७),सागाव(८७.४७), ढोलेवाडी (९४.१९), कणदूर (८५.५३), चरण(८५.९०), नाठवडे(८८.७५),मोहरे(८२.५३), मांगरुळ (८७.२१), पुनवत(८५.४१), शिराळे खुर्द(९१.२५), कोंडाईवाडी (८६.६२), धामवडे(७७.७२), टाकावे(८४.४३),भैरेवाडी (८१.१९), रेड(९१.४३),खेड(९२.६३),भटवाडी(८४.०७), बेलदारवाडी(९४.१५),वाकाईवाडी (७६.९७), सोनवडे(८३.३१),मणदूर(८०.०९), काळुंद्रे(८६.२५), किनरेवाडी(८८.५०), येळापुर(८४.१६),हत्तेगाव(९४.२९), खिरवडे(८७.१६), फुफिरे(८९.१७), अंत्री खुर्द (८३.१३),कांदे(८८.०८),नाटोली(९१.२८), वाडीभागाई(९१.६१). आरळा(८०.४७) असे मतदान झाले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!