बांबवडे ग्रामपंचायत वर गायकवाड गटाचे वर्चस्व
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील चुरशीच्या निवडणुकी पैकी बांबवडे ग्रामपंचायत हि एक चुरशीची ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायत वर माजी सरपंच विष्णू यादव यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करीत मानसिंग दडाव युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांच्या युतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित केली.
या ग्रामपंचायत कडे संपूर्ण तालुक्यासाहित राजकीय गटांचेही लक्ष लागून होते. पूर्वी इथं कर्णसिंह गायकवाड गटाची सत्ता होती. परंतु या निवडणुकीत चौगुले व सहकारी यांनी गाव पनेल या संकल्पनेतून महादेव ग्रामविकास पारदर्शक आघाडी निर्माण करून विष्णू यादव व सहकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. एकीकडे गाव पनेल म्हणून या पारदर्शक आघाडीकडे कुतूहलाने जनता पहात होती. परंतु येथील गायकवाड प्रेमी जनतेने मात्र आजही गायकवाडांचा आवाज बांबवडे मध्ये शाबूत आहे. हे सिद्ध करून दाखवले. इथ विष्णू यादव यांच्या महादेव ग्रामविकास आघाडी ला ७ जागा तर गाव पनेल म्हणजेच पारदर्शक आघाडीला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान सरपंच पदाचे उमेदवार सागर सदाशिव कांबळे हेसुद्धा विष्णू यादव यांच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने दुधात साखर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.