सामाजिक

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) यांची जयंती

शिराळा: आज (ता.२४)लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) यांची जयंती. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी , कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या थोर व्यक्तिमत्वाने अपार कष्ट केले. विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाण्याच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा व सहकारातून समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला. आशा या व्यक्तित्वास त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. आज चिखली येथे दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, चिखलीचे सरपंच राजेंद्र नाईक व विवेक नाईक यांनी स्व. फत्तेसिंगअप्पांच्या समाधीचे व प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, संचालक दत्तात्रय पाटील, एक्सिकेटीव्ही ऑफिसर ए. एन. पाटील, अनिल पाटील-वाकरेकर यांच्यासह यु. जी. पाटील, भानुदास पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, विजय देसाई, संतोषकुमार भालेकर आदी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!