छावा मराठा संघटनेच्यावातीने शिराळ्यात, महाआरोग्य शिबिराचे शनिवारी आयोजन
शिराळा प्रतिनिधी : छावा मराठा संघटना महाराष्ट्र यांच्यावतीने शिराळा येथील शाळा नं. २ ग्रामीण रुग्णालयाजवळ तालुका शिराळा जिल्हा सांगली इथं महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा गरजू जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन छावा मराठा संघटना महाराष्ट्र चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय विष्णू हारुगडे यांनी केले आहे.
हे महाआरोग्य शिबीर शनिवार दि.२८ व रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत असणार आहे. या आरोग्य शिबिरास राज्याचे महसूलमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, श्री. जयंत पाटील( माजी ग्रामविकास मंत्री ), सार्वजनिक मंत्री श्री. शिवाजीराव नाईक, माजी आमदार श्री. मानसिंग भाऊ नाईक,राज्याचे कृषिमंत्री श्री. सदाभाऊ खोत, छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष श्री. सुभाषदादा जावळे,श्री अनिल वाघ( छावा मराठा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष) , छावा मराठा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. रेश्माताई पाटील, श्री सत्यजित देशमुख( सांगली जिल्हा परिषद सदस्य ), अॅड श्री.भगतसिंग नाईक( सभापती, शिराळा पंचायत समिती) , श्री दिलीप (दादा) पाटील( अध्यक्ष, क्षत्रिय मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स) , सौ. वनश्री नानासाहेब महाडिक (उद्योजिका ), श्री विक्रम पाटील (कमांडर ट्रेनिंग सेंटर पुणे ), श्री सम्राटसिंग नाईक ( उपसभापती, शिराळा पंचायत समिती ), आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उपरोक्त शिबिरामध्ये ब्लड प्रेशर तपासणी, डायबेटीज तपासणी, हृदयाची ई.सी.जी. तपासणी, डोळे तपासणी,करण्यात येणार आहे.यावेळी अल्पदरात चष्मे वाटप,कानाची मशीन मोफत,तसेच औषध वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी खालील आजारांवर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहे.
हृदयाची अँजोप्लास्टी, बायपास, वोल्व रिप्लेसमेंट , कँसर शस्त्रक्रिया, मूत्रमार्ग शस्त्रक्रिया (पुरुष ),मणक्याची शस्त्रक्रिया, किडनीचे आजार, हाडांच्या ठराविक शस्त्रक्रिया, अस्थमा, अन्ननलिका शस्त्रक्रिया, थायरॉईड शस्त्रक्रिया, गर्भपिशवी दुरुस्ती,लहान मुलांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी आजारांवर उपचार करण्यात येतील. तरी पंचक्रोशीतील तमाम जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हि संयोजकांच्यावातीने करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिराचे निमंत्रक सौ.रेश्माताई पाटील (छावा मराठा संघटना प.महाराष्ट्र महिला अध्यक्षा), सौ. प्रेमाताई जाधव (महिला सरचिटणीस ),सौ.सविता दमामे (महिला संपर्क प्रमुख ), श्री.संदीप कदम (जिल्हा अध्यक्ष सांगली ), सौ. मीनाक्षी कदम( महिला जिल्हा अध्यक्ष ),सौ. अनिता धस (महिला सरचिटणीस सांगली ),श्री रवींद्र धस( संपर्क प्रमुख ) आदी मान्यवर आहेत.