‘लॅटेराईट ‘ उत्खननास संमिश्र प्रतिक्रिया : स्वाभिमानी संघटनेचा विरोध

बांबवडे : घुंगुर तालुका शाहुवाडी इथं खाण काम उत्खननासाठी बोलवण्यात आलेल्या जाहीर लोकसुनावणीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, तर बाधित पाच गावातून पाण्यासाठी लोकांनी या उत्खननास विरोध दर्शवला. दरम्यान ‘ स्वाभिमानी शेतकरी संघटने ‘ च्यावतीनेहि विरोध करण्यात आला.
घुंगुर इथं झालेल्या लोकसुनावणीत घुंगुर,परळी, आम्बर्डे, परखंदळे ,सावर्डे बु. येथील ग्रामस्थांनी या लोकसुनावणीत सहभाग दर्शवला,तसेच शाहुवाडी तालुक्यातील इतर गावातील ग्रामास्थानीदेखील या सुनावणीत आपली उपस्थिती दर्शवली.
यावेळी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहुवाडी,पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडेकर हे या समितीवर उपस्थित होते. यांच्यासमोर हि सुनावणी घेण्यात आली.
दरम्यान उपरोक्त गावातील डोंगर पठारावर उपलब्ध असलेल्या लॅटेराईट या खनिजाच्या उत्खनना संदर्भात हि सुनावणी बोलवण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले कि, हि सुनावणी तक्रार व सूचना ऐकून घेण्यासाठी आहे तसेच लेखी स्वरुपात देखील ग्रामस्थ आपली मते मांडू शकतात. परंतु याचा निर्णय शासन घेणार आहे, याची नोंद उपस्थितांनी घ्यावी.
यावेळी तांत्रिक सल्लागार डॉ. प्रशांत बन्ने यांनी या उत्खननासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. तसेच या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार असून, येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल. तसेच या प्रकल्पासाठी वहातुकीसाठी लागणारी वाहनेदेखील इथूनच घेतली जाणार असून,ट्रक,जेसीबी, ट्रॅक्टर ,आदी वाहन मालकांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यावरण रक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित कंपन्या घेणार आहेत.
यावेळी उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी या प्रकल्पास संमती दर्शविली आहे.
यावेळी सावर्डे बु. येथील तानाजी रवंदे यांनी या उत्खननास कडाडून विरोध करताना, सांगितले कि, मुळातच या परिसरात पाण्याचा तुटवडा आहे. उपरोक्त गावांना जे पाणी मिळते,ते सायपन पद्धतीने मिळते . पठाराच्या दगडातून मिळणारे पाणी उत्खननानंतर बंद होईल, आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल. दरम्यान या प्रकल्पासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे, यासंदर्भात आपल्याकडे पुरावे देखील आहेत.असेही श्री. रवंदे यांनी सांगितले.
या सुनावणी प्रसंगी महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे आपली मते मांडली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुकाराम खुटाळे, विश्वजित महाजन, सुरेश म्हाऊटकर,अवधूत जानकर आदी कार्यकर्त्यांनी देखील कडाडून विरोध केला. यावेळी शहाजी पाटील तेलवे ,अशोक खोत घुंगुरवाडी, प्रदीप कांबळे सावर्डे बु., महादेव बाडे गमेवाडी, शिवाजी केसरकर घुंगुरवाडी, मानसिंग सावरे, प्रकाश कांबळे करुंगळे, दीपक पाटील ननुंद्रे, रामभाऊ मोहिते, शिवाजी खोत परखंदळे ,विश्वजित महाजन, श्रीकांत खोत घुंगुर, रंगराव किटे सावर्डे बु. ,तानाजी भोसले बांदिवडे, सरदार कांबळे घुंगुर, सागर केसरकर घुंगुर, सविता खोत घुंगुरवाडी, रेखा पाटील घुंगुर, शांताराम पाटील नांदारी, गीता पाटील घुंगुरवाडी, बाजीराव रेडकर नांदगाव, श्रीकांत कांबळे घुंगुरवाडी, मनीषा सुतार घुंगुरवाडी, यशवंत सुतार आम्बर्डे,कल्पना पाटील घुंगुरवाडी आदी नागरिकांनी आपली मते सुनावणी समोर मांडली .
या प्रकल्पाचे काम श्री भैरवनाथ अर्थमुव्हर्स, श्री जुगाई मिनरल्स,घुंगुर, श्री मल्हार मिनरल्स,कोल्हापूर, आणि श्री केदारनाथ मायनिंग अँड अर्थमुव्हर्स कंपनी, बांदिवडे या कंपन्या करणार आहेत.यासाठी वन क्षेत्रातील ११० हेक्टर जमिनीची मागणी करण्यात आली असून, वन खाते ती जमीन द्यायला देखील तयार झाली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!