किटकनाशक विक्रेत्यांचा २ ते ४ नोव्हेंबर बंद चा इशारा
मलकापूर प्रतिनिधी
शाहुवाडी तालुका बियाणे , खते, किटकनाशक विक्रेते संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्या सर्दंभात महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद राहणार असून, या मध्ये सहभागी होऊन, शाहुवाडी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक आपली दुकाने बंद ठेवणार असल्याचे, निवेदन तहसिलदार शाहुवाडी यांच्यासह गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिले आहे .
दरम्यान कोल्हापूर जिल्हा बि- बियाणे, खते, किटक नाशक असोसिएशनच्या वतीने ही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहीते, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनाही संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील ,उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सुनिल डूणुंग, आदीनी बंद बाबत निवेदन दिले आहे.
संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, यवतमाळ येथे किटकनाशक फवारणी दुर्घटनेवरून महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणी मोहीमेतर्गंत कृषी सेवा केंद्र चालकांच्यावर विविध प्रकारे कारवाई केली जात आहे. परिणामी कृषी सेवा केंद्र चालकालाच सर्वस्वी जबाबदार धरून, त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे .
या साठी कृषी सेवा केंद्र चालकांना योग्य न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील खते, बियाणे, किटक नाशक विक्रेते हे २ नोव्हेंबर ते ४ नोंव्हेबर या कालावधीत आपली दुकाने बंद ठेवून, संपावर जाणार असून, ते आपल्या पुढील मागणीचे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी, कृषीविकास अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसिलदार, गटविकासअधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुकाकृषी अधिकारी यांना पुढील मागण्याचे निवेदन दिले आहे.
कृषी सेवा केंद्रचालकांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, निलंबित केलेले परवाने पूर्ववत करावेत, ऑनलाईन परवान्यात समाविष्ठ अर्ज ग्राह्य धरावेत, शासनाने 3ऑक्टोबर२०१७ रोजी काढलेल्या नवीन अध्यादेशाबाबत फेर विचार विनिमय करावा, सर्व किटकनाशक कंपनीना कृषी सेवा केंद्र धारकांना उगमप्रमाण पत्र देणे बंधन कारक करावे , हस्तलिखीत साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय साठा नोंद ग्राह्य धरावा.
या मागण्यासाठी आपले निवेदन दिले असून, आमच्या मागण्याचा विचार करावा, अन्यथा या पुढे बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा ही संघटनेच्या पदाधिकारीसह सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या सह्यांच्या निवेदना द्वारे दिला आहे.