educationalसामाजिक

ग्रामीण भागातील ‘दीप’ दत्तात्रय सुतार गुरुजींना राष्ट्र्रात्न पुरस्कार

मलकापूर प्रतिनिधी:
वारूळ पैकी भिवाची वाडी तालुका शाहुवाडी येथील उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय गोविंद सुतार यांना नेहरू युवा केंद्र युवक कल्याण क्रिडा मंत्रालय भारत सरकार संचलित ‘ पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट ‘ उरूळी कांचन पुणेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखणीय कार्याबद्दल राष्ट्ररत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे..
पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतीक सभागृहात खा. अमर साबळे व जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे आदि मान्यवरांचे उपस्थितीत दत्तात्रय सुतार यांना गौरवण्यात आले .
वारूळ पैकी भिवाचीवाडी सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे .
त्यांच्या या पुरस्काराबद्दल परिसरातून विशेष कौतुक होत आहे

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!