कोडोली येथील यशवंत धमार्थ रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया :पोटातून काढली १ किलोची गाठ
कोडोली:-
कोडोली ता.पन्हाळा येथील यशवंत धमार्थ रुग्णालयात गर्भाशयाच्या पिशवीस असलेली १ किलोची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात येथील डॉ.श्रीकांत बाबर यांना यश आले असल्याचे, संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत पाटील व डॉ.किरण बोरुडे यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, पारगाव ता.हातकणंगले येथे राहणाऱ्या नंदा मारुती माळी वय ३८ यांच्या पोटात दुखू लागल्याने, त्यांना कोडोली येथील रुग्णालयात आणले. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीला गाठ असल्याचे निदर्शनास आले. डॉ.बाबर यांना आज ती गाठ यशस्वीरीत्या काढण्यात यश आले आहे. या शस्त्रक्रियेकरिता भिकाजी लांडगावकर व सचिन पाटील यांचे सहकार्य लाभले