राजकीय मुत्सदेगिरीचं वजनदार व्यक्तिमत्वं- श्री विष्णू यादव
बांबवडे : कमी वयात राजकारणात प्रवेश करून, समाजकारणाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेलं व्यक्तिमत्वं, म्हणजे माजी सरपंच ,व विद्यमान सदस्य श्री. विष्णू रंगराव यादव यादव. जिल्हा परिषदेच्या नंतर ज्यांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेलं हे व्यक्तिमत्वं, वयानं जरी कमी असलं, तरी राजकीय मुत्सदेगिरीनं निश्चितच वजनदार आहे, हे बांबवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांना समजलं आहे.
एकंदरीत विष्णू यांचं वय जरी कमी असलं, तरी गावाची गरज आणि कामांची माहिती, या गोष्टींच्या आधारे, हि व्यक्ती गावाला गरजेच्या असलेल्या सुविधा गावात खेचून आणण्यात कधी कमी पडली नाही. गावच्या सुखसुविधांची त्यांना जाणीव आहे. केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर साहित्य आणि प्रबोधन यासारखी मानवी मनाला उंची प्राप्त करून देणारी सुविधा देखील, ते गावात आणण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. हे आपल्याला बाल साहित्य संमेलनाच्या आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री इंद्रजीत देशमुख यांच्या प्रबोधनातून समजलं आहे. बांबवडे गावात गायकवाड गटाचे वर्चस्व आहे, परंतु दोन गायकवाड गटातील वाद जगजाहीर आहेत. अशातही गावच्या भल्यासाठी या दोन्ही गटातील लोकांना एकत्र आणण्याचं काम, माजी सरपंच विष्णू यादव यांनी केलं आहे.
एकीकडे गाव पॅनेल या नावाची भुरळ जनतेला पडते कि काय, अशी शंका असताना देखील, गायकवाड गटाचे अस्तित्व त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिलं आहे. अकरा पैकी सात जागा निवडून आणून त्यांनी आपल्या मुत्सदेगिरी चा नमुना दाखवून दिला आहे. राजकारणात वय महत्वाचं नसून, कामाची दिशा महत्वाची असते. हे गावच्या निवडणुकीत त्यांनी संपादित केलेलं यश ,यावरून दिसून येतं. भविष्यात या हरहुन्नरी नेतृत्वाला निश्चितच उज्वल दिवस असतील, यात शंका नाही.
बांबवडे च्या विकासाला खऱ्या अर्थाने जर गती द्यायची असेल, तर गावचे प्रमुख प्रश्न म्हणजे गावांतर्गत रस्ते, अपूर्ण असलेली पेयजल योजना पूर्ण करणे, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, या गोष्टी मार्गी लागणे गरजेचे आहे, या कडे बांबवडे ग्रामविकास आघाडी राजकारण विसरून निश्चितच लक्ष देईल याची खात्री आहे.