राजकीय

‘ धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय ‘-नामदार एकनाथ शिंदे

बांबवडे : जिल्ह्यात १० पैकी ६ आमदार शिवसेनेचे व शाहुवाडी तालुक्यात ४९ गावांपैकी बहुतांश गावात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. इथं धनशक्ती च्या विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आहे. असे मत प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सरूड तालुका शाहुवाडी इथं शिवसेनेच्या वतीने आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नामदार शिंदे पुढे म्हणाले कि, शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे कि, इथं शाखाप्रमुखाचा मंत्री होवू शकतो. इथं काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कामाचे मोल मिळतेच मिळते. म्हणूनच इथं झालेल्या ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भरघोस यश मिळवले आहे. आणि जिथं ज्या पक्षाच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून येतात, तिथं आमदार सुद्धा त्याच पक्षाचा होतो. म्हणजेच भविष्यात इथला आमदार पुन्हा एकदा शिवसेनेचाच होणार यात शंका नाही. कारण आमदार सत्यजित यांनी सुमारे ३५० कोटींची कामे तुमच्या मतदारसंघात खेचून आणली आहेत. यामागे आमदार सत्यजित पाटील यांनी केलेला कामांचा पाठपुरावा आहे. आणि कोणतीही विकासकामे आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी, आमदारांचा पाठपुरावा महत्वाचा असतो. आणि तो , तुमच्या आमदारांनी केल्यामुळेच हि विकासकामे तुमच्या मतदारसंघात सुरु आहेत.
दरम्यान ज्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब कोल्हापुरात आले होते, तेंव्हा त्यांनी टोलमुक्तीचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला. जनतेच्या भावना लक्षात घेवून सेनेने नेहमीच सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. कारण सेनेची नाळ नेहमीच सामान्य जनतेशी जुळलेली असते. म्हणून ज्या ज्या वेळी सामान्य जनता अडचणीत येते, त्या त्या वेळी शिवसेनेचा मदतीचा हात जनतेशसाठी नेहमीच पुढे आलेला असतो. असेही नामदार एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि, तालुक्यात पैशांवर चालणाऱ्या मतप्रवाहावर, विकासकामांच्या मतप्रवाहाने विजय मिळवला, आणि विकासकामांचा भगवा फडकला आहे. भविष्यात आपसातील मतभेद विसरून, हातात हात घालून पुढे गेल्यास, या विजयापेक्षा अधिक चांगले चित्र आपल्याला पहावयास मिळेल. यावेळी आमदार सत्यजित पाटील यांनी नाव न घेता माजी आमदार विनय कोरे यांच्यावर टीका करताना सांगितले कि,ज्यांना डीपीटीसी च्या मिटिंग ला उपस्थित रहायला वेळ मिळत नाही,ती मंडळी सर्वसामान्य नागरीकांसाठी वेळ कसा काढणार ? असाही टोला आमदार सत्यजित पाटील यांनी लगावला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर म्हणाले कि, या ग्रामपंचायतीत ज्या पद्धतीने आपण यश मिळवले आहे, ते कौतुकास्पद असून ,असेच एकसंघ राहून काम केल्यास, भविष्यात आपल्याला उज्वल भविष्य निश्चितच मिळेल.
या कार्यक्रम प्रसंगी कर्णसिंह गायकवाड गटाचे कट्टर समर्थक वारणा कापशी चे पैलवान पांडुरंग केसरे यांनी समर्थकांसह आमदार सत्यजित पाटील सरुडकर गटात प्रवेश केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे पाडळकर,व गोंडोली च्या काही कार्यकर्त्यांनी आमदार सत्यजित आबा गटात प्रवेश केला.
यावेळी सरपंच व नूतन सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, जि.प.स. हंबीरराव पाटील, माजी उपसभापती नामदेवराव पाटील सावेकर, शाहुवाडी पंचायत समिती सभापती सौ.स्नेहा जाधव, उपसभापती श्री दिलीप पाटील, जि.प.स.आकांक्षा पाटील, विजयराव बोरगे, दत्तप्रसाद पाटील, युवराज पाटील, गोकुळ च्या संचालिका सौ. अनुराधाताई पाटील, माजी सभापती सौ लतादेवी पाटील रेठरेकर,अमर पाटील,माजी , पं.स.स.पांडुरंग पाटील, पं.स.स. सौ. संगीता पारले, अश्विनी पाटील, श्री सुरेश पारले, दत्ता राणे, जालिंदर पाटील रेठरेकर, महादेवराव पाटील साळशीकर, प्रकाश पाटील, डी.जी. पाटील, सौ. अलका भालेकर, बांबवडे सरपंच सागर कांबळे,अभयसिंह चौगुले, सौ.स्वाती मूडशिंगकर , सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, सारंग पाटील, विशाल साठे व ग्रामस्थ, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!