डंपर चालक ‘ विलीएम केराकेटा ‘ पोलिसांच्या ताब्यात

बांबवडे : आज दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजनेच्या दरम्यान बांबवडे इथं डंपर क्र.MH-50-0061 चा चालक विलीएम सुंदर केराकेटा (वय ४० वर्षे ) याने दुचाकी क्र. MH09-BF-334, व MH09-CY-1013 या दोन दुचाकी व MH09-BC-7456 या मारुती ओमनी,व MH09-CM-2992 या मायक्रा चार चाकी वाहनांना धडक दिली होती. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे.
या अपघातात तुकाराम ईश्वरा खुटाळे हे जागीच ठार झाले तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या अपघातापूर्वी डंपर च्या पुढील काच अगोदरच फुटली होती,त्यामुळे या अपघाता अगोदरदेखील कुठे तरी ठोकर मारली असावी. तसेच डंपर चा चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याने, सदरचा अपघात घडल्याचे उपस्थितांनी सांगितले. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. हीच घटना जर उद्या दि.९ नोव्हेंबर रोजी घडली असती,तर अनर्थ झाला असता,अशीच चर्चा उपस्थितांकडून ऐकावयास मिळत होती,कारण उद्या गुरुवार असल्याने बांबवडे इथ मोठा बाजार भरतो,त्या अनुषंगाने लोकांची गर्दी देखील अधिक असते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!