प्रणोती कोळी ठरली एस.टी. च्या हलगर्जीपणाचा बळी : जखमी विद्यार्थिनीचा मृत्यू

कोडोली प्रतिनिधी :
वारणानगर ता.पन्हाळा येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याचा सुमारास कोडोली हुन कोल्हापूर कडे जाणाऱ्या एस टी क्रमांक एम एच ०६ एस ८९२० एस. टी. चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रणोती प्रकाश कोळी वय १७ राहणार तळसंदे, ही वारणा महाविद्यालयाची तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिचा अॅस्टर आधार हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रणोती ही वारणा महाविद्यालयामध्ये ११ वी सायन्स मध्ये शिकत असून, कॉलेज सुटल्यावर आपल्या मैत्रिणी सोबत ती वारणा बस स्टॉपला एस. टी. ची वाट पाहत थांबली असता, कोडोलीहून कोल्हापूर कडे जाणाऱ्या एस टी बस खाली सापडून गंभीर जखमी झाली होती . तिला उपचारासाठी वारणा येथील खाजगी रुग्णालय मध्ये नेण्यात आले, पण तिची तब्येत नाजूक असल्याने तिला कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते. विध्यार्थी एस टी मध्ये चढत असताना, एस टी वाहकाने बस पुढे घेतल्याने हा अपघात झाल्याचे प्रवाशातून बोलले जात आहे. प्रणोतीच्या अपघाती निधनाने तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!