वारणानगर येथे एस.टी.चालकाच्या हलगर्जीपणामुळे कॉलेज तरुणी गंभीर जखमी
कोडोली प्रतिनिधी:
वारणानगर ता.पन्हाळा येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याचा सुमारास कोडोली हुन कोल्हापूर कडे जाणाऱ्या एस टी क्रमांक एम एच ०६ एस ८९२० या एस टी चालकाच्या हलगर्जी पणामुळे प्रणोती प्रकाश कोळी वय १७ राहणार तळसंदे ही वारणा महाविद्यालयाची तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
प्रणोती, ही वारणा महाविद्यालयामध्ये ११ वी सायन्स मध्ये शिकत असून, कॉलेज सुटल्यावर आपल्या मैत्रिणी सोबत ती वारणा बस स्टॉपला एस टी ची वाट पाहत थांबली असता, ही घटना घडली. विध्यार्थी एस. टी. मध्ये चढत असताना, एस. टी. वाहकाने बस पुढे घेतल्याने, हा अपघात झाल्याचे प्रवाशातून बोलले जात आहे. तिला उपचारासाठी वारणा येथील खाजगी रुग्णालय मध्ये नेण्यात आले, पण तिची तब्येत नाजूक असल्याने, तिला कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात नेण्यात आले आहे. अशा घटनां बाबत वेळोवेळी तक्रार देवून देखील, कोल्हापूर एस टी महामंडळाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही याचा त्रास विद्यार्थी, शिक्षक,प्रवाशी यांना होत असतो, तर आज एक कॉलेज तरुणीला गंभीर अशी दुखापत झाली आहे.