वारुळात ‘ दारूबंदी ‘ नंतर जल्लोष
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यातील वारूळ गावात महिलांनी दारूबंदी केल्याने अनोखे चैतन्य पसरले असून, या दारूबंदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. तसेच या दारूबंदीसाठी ओम गणेश मंडळ, सत्य अविनाश मंडळ, शिवराजे तरुण मंडळ, बौध्द विकास तरुण मंडळ यांच्यासहित दारूबंदी संघर्ष समिती ने हि जोर लावल्याने, हि मोहीम ग्रामस्थांनी यशस्वी केली.
दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात २५९ मतांनी बाटली आडवी झाली, आणि अवघ्या गावात जल्लोष साजरा करण्यात आला. या आनंदात महिलांचा पुढाकार अधिक होता.
यावेळी दारूबंदी कृती समिती कोल्हापूर चे निमंत्रक म्हणाले कि, इथं महिला व तरुणांच्या एकीतून दारूबंदी ला यश मिळाले आहे. हे यश गावच्या विकासाला चालना देणारे ठरेल. या विजयाने गावाच्या इतिहासात विधायकतेची नोंद केली आहे.
या विजयानंतर गुलालाच्या उधळणीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या प्रक्रियेत येथील सामाजिक कार्यकर्ते सिराज शेख ,शंकर पाटील, गोविंद सुतार, आर.एस. कांबळे ,बापू गोटांगळे, अशोक तायरे, यशवंत पाटील, प्रकाश पाटील, धनंजय पवार आदी मंडळींनी सहभाग दर्शवला. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, केंद्राध्यक्ष अंकुश रानमळे, उत्पादन शुल्क अधिकारी संजय जाधव, सचिन सवड आदी मंडळींनी प्रशासकीय काम पहिले.तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी मतदान वेळी केंद्राला भेट दिली.