बांबवडे देवस्थान उपसमिती च्या अध्यक्षपदासाठी श्री रवींद्र फाटक : बांबवडे गावसभा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील देवस्थान उप समिती च्या अध्यक्ष पदी श्री रवींद्र फाटक यांची निवड करण्याचे दि.१७ नोव्हेंबर रोजी झालेल्या गावसभेत निर्णय घेण्यात आला.
बांबवडे गावच्या गावसभेचे आजदि.१७ नोव्हेंबर रोजी नियोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी गजानन निकम होते,तर सचिव म्हणून ग्रामसेवक गिरीगोसावी यांनी काम पाहिले. या गावसभेत देवस्थान उपसमिती कार्यकारिणी निवड, ‘ रमाई आवास योजना ‘ असे मुख्य विषय घेण्यात आले.
दरम्यान देवस्थान उपसमिती चे माजी अध्यक्ष श्री रुद्राप्पा बाऊचकर आण्णा यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे रिक्त पद भरणे गरजेचे होते. यावेळी अध्यक्ष पदासाठी श्री रवींद्र फाटक यांचे नाव सुचविण्यात आले. ते अगोदर याच समिती मध्ये खजाणीस पदी नियुक्त होते. तसेच यावेळी कार्यकारिणीसाठी अन्य नावे देखील सुचविण्यात आली.
यावेळी रमाई आवास योजनेबाबत आवश्यक असलेल्या अटी देखील सांगण्यात आल्या. तसेच प्रभाग क्र.४ मध्ये असलेल्या काही कुटुंबांसाठी शौचालयाची मागणी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान सभेपुढील विषय संपल्या नंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवक गिरीगोसावी यांना राष्ट्रीय पेयजल योजनेबाबत विचारणा केली. यावेळी दप्तर उपलब्ध नसल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले, तसेच चौकशी करून माहिती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामसेवकांची सुटका झाली.
यावेळी सदस्य सुरेश नारकर, विष्णू यादव, विद्यानंद यादव, विमल कुंभार, नूतन सरपंच सागर कांबळे, देवस्थान उपसमिती चे सर्जेराव निकम, रवींद्र फाटक, महादेव मुडशिंगकर ,सयाजी निकम, अभयसिंह चौगुले हे नूतन सदस्य , बाळासाहेब पाटील, स्वप्नील घोडे-पाटील, विजय घोडे-पाटील, दत्तत्रय यादव , सचिन मुडशिंगकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य श्री तानाजी चौगुले, पोलीस पाटील संजय कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.