राष्ट्रीय पेयजल योजनेचे ‘ दप्तर ‘ च गायब ? : ग्रामसेवक निरुत्तर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी साठी राष्ट्रीय पेयजल योजना अंदाजे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाची मंजूर झाली आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याने या योजनेची चौकशी व्हावी,अशा आशयाचा तक्रार अर्ज ग्रामसेवक गिरीगोसावी यांना देण्यात आला आहे. तसेच सदर योजनेचे दप्तर सुद्धा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नसल्याची कबुली ग्रामसेवक यांनी दिली.
सदर योजनेत भ्रष्टाचार झाला असून स्ट्रेंज गॅलरी व इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे आरोप महादेव विलास निकम यांनी आपल्या तक्रार अर्जात केला आहे. सदर योजनेचे दप्तर ग्रामपंचायत मध्ये असणे ,गरजेचे असतानाही दप्तर उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. सदर कामाची चौकशी व्हावी,अशीही मागणी केली जात आहे. यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना गावसभेनंतर घेराव घातला, आणि माहिती ची मागणी केली. परंतु सोमवारपर्यंत चौकशी करून माहिती देतो,असे उत्तर ग्रामसेवक यांनी उपस्थिताना दिले. परंतु दप्तर च गायब याला सेवकांनी होकारार्थी मान हलवून उत्तर दिले.
या तक्रार अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री,ग्रामविकासमंत्री यांना देण्यात आल्याचे समजते.