शिरशीच्या मंदिरात अनोळखी इसमाचा खून
शिराळा: शिरशी (ता.शिराळा) येथील शिरशी ते भैरववाडी दरम्यान डोंगरात असणाऱ्या चक्रभैरवीश्वर मंदिरात ४० ते ४२ वर्षांच्या अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा दगड व वीट डोक्यात घालून खून केला आहे . सोबत नारळ व लिंबु आढळून आले असून, त्यात टाचण्या रोवल्या चे आढळून आले आहे . त्यामुंळे हा नरबळीच असावा, अशी तालुक्यात सर्वत्र चर्चा होती. मात्र तो नरबळी नसून, खून असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे .
याबाबत पोलीस पाटील जयश्री तानाजी जाधव यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. हि घटना दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी कि , देवळाचे प्लास्टर करण्याचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी दत्तात्रय दाजी महिंद यांचे कामगार प्लास्टर करण्यासाठी गेले होते. त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात देवा समोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी हि महिती मालक दत्तात्रय महिंद यांना दिली. त्यावेळी महिंद यांनी पोलीस पाटील जयश्री यांना त्यांच्या घरी जाऊन माहिती दिली. त्यावेळी सदरची घटना कळताच पोलिसांसह तानाजी जाधव, दिनकर जाधव, सूर्यकांत भोसले, दत्तात्रय महिंद व ग्रामस्थांनी घटना स्थळी भेट दिली.
त्या ठिकाणी जाऊन पहिले असता, मंदिराच्या गाभाऱ्यात देवा समोर दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय अशा उताणी स्थितीत अनोळखी ४०ते ४२ वर्षाचा पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. प्रेताच्या डोक्यापासून मंदिराच्या उंबऱ्या पर्यंत रक्त वाळलेले आढळून आले. त्याच्या चेहऱ्याच्या डाव्य डोळ्याच्या भुवईवर व नाका पर्यंत जखम आहे. त्याच्या मानेजवळ लिंबु असून त्यात टाचण्या लावलेल्या दिसत आहेत. देवाच्या चौथऱ्यावर पाच लिंबूवर टाचण्या लावल्या आहेत. पायाजवळ नारळ व प्रेताच्या बाजूस काळा दगड व वीट पडलेली आहे. अंगावर पांढरे व काळे चौकटीचा फुल बाहीचा शर्ट व निळसर रंगाची फुल प्यांट आहे. पुढील तपास सहायक पालिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करत आहेत.
एकीकडे आपला देश डिजिटल होत आहे,तर दुसरीकडे करणीचे प्रकार वाढले आहेत.
शिराळा तालुक्यात कांदे, शिराळे खुर्द, वाडीभागाई,भटवाडी येथे बाहुल्यावर लोकांची नावे लिहून लिंबूवर टाचण्या रोवल्या होत्या.त्यामुळे तालुक्यात वर्षभरात करणीने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. आत्ता देवाच्या गाभाऱ्यात हि घटना घडल्याने जिल्ह्यात दिवसभर खळबळ उडाली होती.
मयताच्या खिशात अनखलखोप -पाचवा मैल असे तिकीट सापडले आहे.त्यामुळे ती व्यक्ती त्या परिसरातील असण्याची शक्यता आहे.