आंबा इथं बीएसएनएल केंद्राला आग : लाखोंचे नुकसान

मलकापूर प्रतिनिधी :
आंबा तालुका शाहुवाडी येथील बी .एस.एन.एल.च्या केंद्राला अचानकआज दि.२४/११/२०१७ रोजी सायंकाळी पाच वाजता शॉर्टसर्कीटने आग लागली . शॉर्टसर्कीट ने लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाले असल्याचा, अंदाज वर्तवला जात असून, रात्री उशीरा पर्यंत नुकसानीचा नेमका आकडा समजला नव्हता. साधरणत: दीड तास आग धुमसत होती. केंद्रातील वायरींग , फोन इस्टिमेट .बॅटरी एसी सिस्टिम , वीजसाहीत्य , जळून खाक झाले. वायरींग जळत गेल्याने धुमसत धुराचे लोट बाहेर येत होते. सर्कीट प्रसंगी कर्मचारी बाहेर गेले होते. आग धुमसताच वीजपुरवठा बंद करण्यात आला, त्यामूळे इमारत वाचली.
दरम्यान मलकापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणली. आगीची घटना समजताच, त्वरीत आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!