वाकुर्डेखुर्द अपघातातील महिलेचे निधन
शिराळा प्रतिनिधी : वाकुर्डे खुर्द तालुका शिराळा येथील अपघातात जखमी सविता सोमाजी पावणे यांचे उपचार दरम्यान कराड येथील कृष्ण हॉस्पिटल मध्ये निधन झाले.
४ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता गोळेवाडी -पेठ रस्त्यावर मोटरसायकलवरून जात असता, तोल जावून पडल्याने अपघात झाला होता. सुमारे एक महिना त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांचे ४ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास हवालदार बी.डी.गवारी हे करीत आहेत.