बांबवडे च्या उपसरपंच पदी श्री सयाजी निकम

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी च्या उपसरपंच पदी सयाजी निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक जे.एल. गिरीगोसावी यांनी काम पहिले. सभेच्या अध्यक्षस्थानी नूतन सरपंच सागर कांबळे होते.
बांबवडे ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. यामध्ये महादेव ग्रामविकास आघाडी व महादेव ग्रामविकास परिवर्तन आघाडी (गाव पॅनेल ) या दोन गटात अटीतटीची लढत झाली. या लढतीत महादेव ग्रामविकास आघाडीने ११ पैकी ७ जागा जिंकल्या.तसेच सरपंच पदाची जागा सुद्धा या आघाडीने जिंकली आहे. तर महादेव ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या फक्त चारच जागा निवडून आल्या.
उपसरपंच पदाच्या निवडीनंतर गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पॅनेलप्रमुख माजी सरपंच विष्णू यादव यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!