कोपर्डी प्रकरणी आज शिक्षा : फाशी कि जन्मठेप
बांबवडे : कोपर्डी निर्भया बलात्कार व हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दि.२९/११/२०१७ रोजी या आरोपींना न्यायालय शिक्षा सुनावणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिघाना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांनी या आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.