तानाजी पाटील यांची गणित परिषदेसाठी निवड

बांबवडे : शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहुवाडी येथील तानाजी चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि आयआयटी पवई, यांच्यातर्फे ‘ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ्सएजुकेशन ‘ या प्रकल्पासाठी ‘ मॅथ्स मास्टर ट्रेनर ‘ हि पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे. यामुळे त्यांची कोची (केरळ) इथं राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘ टाईम २०१७ ‘ या गणित परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद दि.७ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी असणार आहे.
त्यांच्या या निवडीसंदर्भात संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र कोकाटे यांनी तानाजी पाटील यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या शिक्षकवृंदानेही त्यांचे अभिनंदन केले आहे.

7+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!