भोंगेवाडी च्या उपसरपंच पदी सुनील दळवी
पैजारवाडी प्रतिनिधी :-
भोंगेवाडी ता.पन्हाळा येथील उपसरपंच पदी सुनील यशवंत दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड.सभेच्या अध्यक्षस्थानी नूतन सरपंच मानसिंग दळवी होते. उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला होता. ग्रामसेविका लता कणसे यांनी दळवी यांची निवड जाहीर करून, त्यांचा सत्कार केला. यावेळी सर्व ग्रा.पं.सदस्य माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.