बोरपाडळे प्रा.आरोग्य केंद्रामधील उपहारगृहचे बांधकाम शुभारंभ
पैजारवाडी प्रतिनिधी :-
बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे प्रा.आरोग्य केंद्रामधील उपहारगृहचे बांधकाम शुभारंभ जि.प.सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते पंचायत समिती पन्हाळा उपसभापती सौ.उज्ज्वला पाटील, पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील व अनिल कंदूरकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषद नावीन्य पूर्ण योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन उपहार गृह नियोजित असून, यापैकी एक उपहार गृह प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे येथे होत असल्याची माहिती, वैद्यकीय अधिकारी डॉ.आशितोष तराळ यांनी आपल्या प्रास्ताविकामधून दिली.
बोरपाडळे प्रा.आरोग्य केंद्रामधे उपचारासाठी गरोदर माता व इतर रुग्णांचा वाढता ओघ पाहून, अशा विविध योजना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा पतिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सदैव सहकार्य राहील, असे प्रतिपादन या कार्यक्रमप्रसंगी बोलताना शिवाजीराव मोरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम हुरदुके यांनी, तर आभार संपत पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास सरपंच शरद जाधव, उपसरपंच संगीत बिरंजे, सदस्य संगीता साठे, संगीत कोळी, श्रीरंग वरके, सतिश निकम, सचिन पाटील, संजय लंबडे, तंटामुक्त अध्यक्ष अतुल पाटील, भाजप तालुका ओबीसी अध्यक्ष संदीप कुंभार, विविध संस्थांचे पदधिकारी ग्रामपंचायत व प्रा.आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.