सामाजिक

‘ जागतिक एड्स दिन ‘ बोरपाडळे इथं संपन्न

पैजारवाडी प्रतिनिधी :- कृष्णात हिरवे
बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ.दीपक पाटील नर्सिग इन्स्टिट्यूट बोरपाडळे यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर ‘ जागतिक एड्स दिन ‘ साजरा करण्यात आला.
जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष तराळ, नर्सिग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ.स्वाती पाटील यांनी आरोग्य केंद्रातील रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना व ग्रामस्थांना या रोगाची लक्षणे, रोगाचा प्रसार, उपचार पद्धती, घ्यावयाची काळजी आणि सावधगिरी या बाबत मार्गदर्शन केले .
यावेळी नर्सिग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे बोरपाडळे परिसरात ‘ एड्स ‘ बाबत जनजागृती करून एड्स (एच.आय.व्ही) विषयी माहिती देणारी, रांगोळी व चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रा.आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व नर्सिग इन्स्टिट्यूटचे शिक्षक, कर्मचारी वर्ग बोरपाडळे ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!